सांगलीत लग्नसमारंभातून ४ लाखांचे सोन्याचे गंठण लंपास; संशयित तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
लग्नसमारंभातून सोन्याच्या गंठणाची चोरी; संशयित तरुण अटकेत. | फोटो : प्रतिनिधिक छायाचित्र (Sangli Today)

सांगली : माधवनगर कर्नाळ रोडवर असणाऱ्या हुपरी गार्डन येथे झालेल्या लग्नसमारंभातुन ४ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरी करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. फिरासत फक्रुद्दीन शेख (वय २२, रा. मकान गल्ली, खणभाग, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

दि. ३ फेब्रुवारी रोजी हुपरी गार्डन येथे लग्नसोहळा सुरू असताना संशयिताने समारंभात प्रवेश केला. या वेळी शुभम अनिल देसाई (रा. गव्हर्नमेंट कॉलनी, विश्रामबाग) यांच्या पत्नीच्या बॅगेत ठेवलेले तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण संशयिताने लंपास केले. दुपारी सुमारे पावणेबारा ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला.

दुपारी साडेचारच्या सुमारास बॅगेत गंठण आढळून न आल्याने कार्यालयात शोधाशोध करण्यात आली. त्यानंतर, गंठण चोरीस गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देसाई यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. हुपरी गार्डनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पथकाला फुटेजमध्ये रेकॉर्डवरील संशयित आढळून आला.

दरम्यान, आरोपी चिन्मय पार्क परिसरात चोरीचे सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले. चौकशीत आरोपीने लग्नसमारंभात चोरी केल्याची कबुली दिली.

हेही वाचा: कुपवाड रोडवरील हडको कॉलनीतील घराला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा