सांगली : राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सांगली जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून गौरविण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन आणि ग्रामपातळीवरील उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय मूल्यमापनात जलसंधारण, वृक्षलागवड, प्लास्टिकमुक्त उपक्रम, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता या घटकांचा आढावा घेण्यात आला. या निकषांवर सांगली जिल्हा परिषद अव्वल ठरल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली.
या अभियानाच्या अंमलबजावणीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे (IAS), तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे (IAS) तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) शशिकांत शिंदे यांच्या कार्यकाळातील उपक्रमांची नोंद घेण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, ‘माझी वसुंधरा’ अभियानात सांगली जिल्हा परिषदेला यापूर्वीही राज्यात प्रथम क्रमांक मिळाला होता. सलग कामगिरीमुळे जिल्ह्यातील पर्यावरणीय उपक्रमांकडे राज्यस्तरावरून लक्ष वेधले गेले आहे.
हेही वाचा: पेठ–नायकलवाडी रस्त्यावर बिबट्याची झडप; 12 वर्षीय मुलासह तिघे जखमी.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









