सांगली : लोकमत समूहाच्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026’ या राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील तीन व्यक्तींचा वेगवेगळ्या विभागांत समावेश झाला आहे. राज्यभरातील उमेदवारांमध्ये सांगलीचे प्रतिनिधित्व दिसून येत आहे.
राजकारण (प्रॉमिसिंग) विभागात आमदार रोहित आर. पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) यांचे नाव समाविष्ट आहे.
क्रीडा विभागात पॅरालिम्पियन गोळाफेकपटू सचिन खिलारी यांना स्थान देण्यात आले आहे.
तर लोकसेवा – समाजसेवा विभागात ‘इन्साफ फाउंडेशन, सांगली’चे मुस्तफा मुजावर यांचा समावेश करण्यात आला आहे.
ऑनलाइन मतदानाच्या माध्यमातून ही स्पर्धा होत असून संबंधित अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांची माहिती व मतदान प्रक्रिया सुरु आहे. अधिक तपशील https://lmoty.lokmat.com/vote.php येथे पाहू शकता.
राजकारण, क्रीडा आणि समाजसेवा अशा तीन वेगवेगळ्या क्षेत्रांतून सांगली जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवरील स्पर्धकांच्या यादीत झळकले आहे.
हेही वाचा: ‘माझी वसुंधरा’ अभियानात सांगली जिल्हा परिषद राज्यात पुन्हा अव्वल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










