तासगाव : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गव्हाण (ता. तासगाव) शाखेत शासकीय शेतकरी अनुदान खात्यातून 12 लाख 32 हजार 854 रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकेच्याच दोन अधिकाऱ्यांविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेचे अधिकारी प्रवीण कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाखाधिकारी बाबासाहेब बाळासाहेब पाटील (रा. बोरगाव) आणि सिनिअर असिस्टंट अरुण दादासाहेब पाटील (रा. बिसूर) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 2019 ते 2020 या कालावधीत शासकीय शेतकरी अनुदान खात्यांमधील रक्कम खातेदारांच्या संमतीशिवाय काढण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
परमेश्वर पाटील, रघुनाथ भगवान पाटील, दिलीप एकनाथ पाटील, सुभद्रा आकाराम घोरपडे आणि अशोक रंगनाथ जाधव या खातेदारांच्या नावे स्लिपवर बनावट सह्या करून रक्कम उचलल्याचा आरोप आहे. मोठ्या व्यवहारांपूर्वी सह्यांची पडताळणी करणे ही शाखाधिकाऱ्याची जबाबदारी असतानाही व्यवहारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचेही तपासात नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या शेतकरी अनुदानावरच डल्ला मारल्याचा आरोप असल्याने बँकिंग क्षेत्रात आणि शेतकरी वर्गात संतापाची भावना व्यक्त होत आहे. अंतर्गत चौकशीत अपहार सिद्ध झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तासगाव पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध सुरू आहे.
हेही वाचा: लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026’ स्पर्धेत सांगलीची एन्ट्री; तीन वेगवेगळ्या क्षेत्रांतून उमेदवार.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










