कवठेमहांकाळ : सोशल मीडिया चॅनेल विक्रीच्या आमिषाने लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) येथील तरुणाची 1 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मध्य प्रदेशमधील इंदोर येथून एका संशयिताला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रोहित उघरेजिया (रा. इंदोर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. आनंद एकनाथ सावंत (वय 34, रा. लंगरपेठ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘रोहित उघरेजिया’ नावाने संपर्क साधून संबंधिताने सोशल मीडिया चॅनेल विकणार असल्याचे सांगितले. त्या चॅनेलवर मोठ्या प्रमाणावर सबस्क्रायबर्स असून त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे सांगून 2 लाख 10 हजार रुपयांत चॅनेलचा व्यवहार ठरवण्यात आला.
21 एप्रिल 2025 पासून विविध टप्प्यांत फिर्यादीकडून फोनपेच्या माध्यमातून 1 लाख 95 हजार रुपये संशयिताच्या खात्यावर जमा करण्यात आले. उर्वरित रक्कम चॅनेलचा पूर्ण ताबा मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते.
रक्कम जमा झाल्यानंतर काही वेळ लॉगिन तपशील दिल्याचे भासवून नंतर पासवर्ड बदलून चॅनेलवरील प्रवेश बंद करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पैसे परत मागितल्यावर संशयिताने उलट खोटी तक्रार करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने पोलीस तक्रारीत सांगितले आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल शिवशरण यांनी तांत्रिक तपासाद्वारे संशयिताचा माग काढून त्याला इंदोर येथून ताब्यात घेतले असून कवठेमहांकाळ पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: शेतकरी अनुदानात 12.32 लाखांचा अपहार; सांगली जिल्हा बँकेच्या गव्हाण शाखेतील दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










