सांगली : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांदरम्यान सांगली जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त’ परीक्षा प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे. परीक्षा केंद्रांवर डिजिटल मॉनिटरिंग प्रणालीच्या माध्यमातून देखरेख केली जात असून त्यामुळे पारदर्शकता वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. डिजिटल वॉचच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवरील हालचालींवर बारकाईने नजर ठेवून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.
जिल्ह्यातील शिक्षक आणि केंद्रप्रमुखांनीसुद्धा समन्वयाने काम करत परीक्षा शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. डिजिटल देखरेखीची पद्धत पुढील काळातही सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा: सोशल मीडिया चॅनेल विक्रीच्या आमिषाने लंगरपेठ मधील तरुणाची 1.95 लाखांची फसवणूक; इंदोरमधील संशयितास अटक.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










