सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर (UICC) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिरात डॉ. परमशेट्टी, डॉ. रियाज मुजावर, डॉ. गांधी आणि डॉ. टकले यांच्या पथकाकडून घंटागाडी कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्वसाधारण आरोग्य चाचण्या करून आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
“स्वच्छता कर्मचारी निरोगी राहिले तरच शहराची सेवा अधिक प्रभावी होईल,” असे डॉ. परमशेट्टी म्हणाले.
महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासण्यांचा समावेश करण्याची सूचना दिली. तसेच, नूतन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगितले.
पुढील काळात अशा स्वरूपाचे आरोग्य तपासणी उपक्रम नियमितपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: दहावी-बारावी परीक्षांत सांगली जिल्हा ‘कॉपीमुक्त’; डिजिटल मॉनिटरिंगमुळे पारदर्शकता.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










