सांगली : तासगाव तालुक्यातील उपळावी येथील एका शाळेत इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप करत मुख्याध्यापकांसह काही शिक्षकांविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपळावी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला शाळेतील काही शिक्षकांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली आहे.
तक्रारीनुसार, मुलीच्या वडिलांनी शाळेच्या पालक मिटींगमध्ये बोलल्याचा राग मनात धरुन विद्यार्थिनीला किरकोळ कारणांवरून मारहाण करणे, वर्गात सर्वांसमोर उभे करून तिचा अपमान करणे तसेच शाळेच्या आवारात गवत काढायला लावणे असे प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या खचल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि काही शिक्षकांविरोधात अल्पवयीन मुलांच्या संरक्षणासंबंधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तासगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा: पाण्याच्या शिंतोड्यांवरून वाद; जत येथे दहावीच्या विद्यार्थ्यावर पाईपने हल्ला.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










