तासगाव : नागाव (निमनी) गावच्या हद्दीत पलूस-सांगली रोडवर दुचाकींच्या धडकेत 39 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अमोल सुभाष पाटील (वय 39, रा. येळावी, ता. तासगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 मार्च रोजी सकाळी सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास अमोल पाटील हे दुचाकीवरून सांगलीकडे जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, तासगाव येथे दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी आदीत्य विश्वास ठोंबरे (रा. कर्नाळ, ता. मिरज) याच्याविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: डिजिटल प्रशासनात सांगली जिल्हा परिषदेची मोठी झेप; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










