सांगली : मतदार यादीतील नाव व माहिती तपासण्यासाठी सांगली विधानसभा मतदारसंघात 3 ते 5 एप्रिल दरम्यान विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.
या कॅम्पमध्ये नागरिकांना आपल्या मतदार नोंदीची पडताळणी, दुरुस्ती तसेच आवश्यक माहिती अद्ययावत करण्याची संधी मिळणार आहे. मतदान केंद्रांवरच हे कॅम्प होणार असल्याने नागरिकांना सोयीस्कर पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
प्रशासनाकडून मतदारांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ‘मॅपिंग’ प्रक्रिया राबवली जात असून, यामध्ये कुटुंबीयांच्या आधारे नोंदी तपासल्या जाणार आहेत. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून घरोघरी भेट देऊन माहिती घेतली जाणार आहे.
नागरिकांनी या प्रक्रियेत सहकार्य करून आपली माहिती अचूक ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: तासगाव: नागावजवळ भीषण अपघात; येळावीच्या तरुणाचा मृत्यू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










