जत : दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान किरकोळ वादातून एका विद्यार्थ्यावर लोखंडी पाईपने हल्ला झाल्याची घटना जत येथे घडली. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रावळगुंडवाडी (ता. जत) येथील शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र जत येथील एसआरव्हीएम हायस्कूल येथे होते.
दि. 9 मार्च रोजी सकाळी गणित विषयाचा पेपर सुरू होण्यापूर्वी तो शाळेतील पाण्याच्या टाकीजवळ पाणी पित होता. यावेळी चुकून पाण्याचे शिंतोडे दुसऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावर उडाल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी संबंधित विद्यार्थ्याने पेपर संपल्यानंतर पाहून घेण्याची धमकी दिली.
दरम्यान, दुपारी सव्वाएक वाजता पेपर संपल्यानंतर विद्यार्थी शाळेच्या गेटबाहेर बसजवळ उभा असताना दुसरा विद्यार्थी लोखंडी पाईप घेऊन तेथे आला आणि त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या विध्यार्थी आणि बस चालकाने त्याला सावरले, बंदोबस्तासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांनी जखमी विद्यार्थ्याला प्रथम जत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मिरज येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार देण्यात आली असून जत पोलिस पुढील तपास करत आहेत.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










