सांगली : सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी ही १६ वर्षांची असून ती सध्या शिक्षण घेत आहे. संशयित आरोपी मिलिंद भुई (रा. उदगाव, जयसिंगपूर) याने ऑक्टोबर २०२५ मध्ये पीडितेला तिच्या गावातील एका मंदिराजवळ गाठले होते. तिथे त्याने पीडितेचा अश्लील व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेवर वेळोवेळी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
पीडितेने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, तिने जेव्हा आरडाओरडा करण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संशयिताने तिला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणही केली. संशयिताच्या सततच्या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
पीडितेच्या तक्रारीवरून सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित मिलिंद भुई याच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह, सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध (POCSO) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सांगली ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
येथे वाचा: Sangli Crime News Today.
हेही वाचा: मिरजेत महिला दिनानिमित्त ‘महिला गौरव’ पुरस्कार वितरण; महापालिकेकडून महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










