मिरज : जागतिक महिला दिनानिमित्त सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महिला व बालविकास विभागातर्फे मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या विविध विभागांतील महिला अधिकारी, कर्मचारी तसेच आशा वर्कर यांचा ‘महिला गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात महिलांसाठी तणाव व्यवस्थापन व आरोग्य विषयक प्रबोधनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले. मिरज पंचायत समितीच्या रिसोर्स पर्सन रूपाली चोथे यांनी तणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले, तर वैद्यकीय अधिकारी सुचेता पवार यांनी महिलांच्या आरोग्याबाबत माहिती दिली.
याशिवाय प्रश्नमंजुषा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










