सांगली : शहरातील 100 फुटी रस्ता परिसरात मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्यामुळे आज (बुधवार, 11 मार्च) आकाशवाणी जलकुंभाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या गळतीची दुरुस्ती तातडीने सुरू केली आहे. हिराबाग केंद्र ते आकाशवाणी टाकीकडे जाणाऱ्या 400 मिमी व्यासाच्या डी.आय. जलवाहिनीला ही गळती लागल्याचे निदर्शनास आले आहे.
दुरुस्ती दरम्यान जलवाहिनीवरील काँक्रीट थ्रस्ट ब्लॉक तिरका झाल्याचे आढळल्याने भविष्यात पुन्हा गळती होऊ नये यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य दुरुस्ती केली जात असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
या कामामुळे आकाशवाणी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून हिराबाग झोनमधील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बाधित भागांमध्ये गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. एस. कुरणे यांनी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा: कुपवाड एमआयडीसीतील कारखान्यात 7 लाखांचे ॲल्युमिनियम साहित्य चोरी; तिघांना अटक.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










