कुपवाड : कुपवाड एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यातून सुमारे 7 लाख रुपये किमतीचे ॲल्युमिनियम साहित्य चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात गंगा गणेश गोसावी (46, रा. प्रकाशनगर, कुपवाड), आकाश ज्ञानू गोसावी (33) आणि विकास ज्ञानू गोसावी (36, दोघे रा. माधवनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
तर निवास सुंदर घाडगे (वय 33, रा. प्रकाशनगर, कुपवाड), भरत ऊर्फ बंटी नामदेव जाधव (रा. माधवनगर), बंटी (पूर्ण नाव व पत्ता नाही. रा. वाल्मिकीनगर, सांगली) हे संशयित फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील दत्तनगर (बामणोली) येथील राकेश महाजन यांच्या मालकीच्या कुपवाड एमआयडीसीतील ‘माईड प्लो’ कंपनीच्या आवारात ॲल्युमिनियम साहित्य ठेवले होते.
दरम्यान, संशयितांनी 25 मे ते 22 नोव्हेंबर 2025 या कालावधीत कारखान्याच्या कंपाउंडवरून आत प्रवेश करून सुमारे 7 लाख रुपये किमतीचे साहित्य चोरी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपींना अटक करण्यात आली. चोरीसाठी वापरलेला टेम्पो (MH 09 BC 1258) पोलिसांनी जप्त केला आहे.
हेही वाचा: आखाती तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत 24 तास नियंत्रण कक्ष; गॅस व अत्यावश्यक वस्तूंसाठी हेल्पलाइन जाहीर.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










