सांगली : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी गॅस पुरवठ्यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी 18002333555 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासंदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी 0233-2600500 या लँडलाईन क्रमांकावर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधता येणार आहे.
दरम्यान, चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










