Sangli News : कुष्ठरोगग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे सांगली जिल्हा परिषद; वसाहती व रुग्णालयाला सीईओंची भेट

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Sangli ZP Support Leprosy Patients CEO Vishal Narwade Visit | फोटो सौजन्य : ceo_zpsangli (Instagram)

सांगली : गरजू व उपेक्षित घटकांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.) यांनी नुकतीच कुष्ठरोगग्रस्त व्यक्ती वास्तव्यास असलेल्या वसाहतीस तसेच रिचर्डसन रुग्णालयास भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी उपचार सुरू असलेल्या रुग्णांशी तसेच उपचार पूर्ण झालेल्या व्यक्तींशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अनुभव व गरजा जाणून घेतल्या. कुष्ठरोगग्रस्तांना समाजात सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आवश्यक आरोग्यसेवा, पुनर्वसन आणि शासकीय सुविधांची उपलब्धता महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यानंतर विशाल नरवाडे यांनी कुष्ठरोगासाठी विशेष उपचार देण्यात येणाऱ्या रिचर्डसन रुग्णालयास भेट देऊन तेथील उपचारपद्धती, पुनर्वसन उपक्रम आणि रुग्णसेवेची माहिती घेतली. कुष्ठरोग निर्मूलनासाठी कार्यरत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवांचे त्यांनी कौतुक केले.

या पाहणीमुळे कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींमध्ये आधार आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून, गरजू घटकांसाठी संवेदनशील प्रशासनाची भूमिका अधोरेखित झाली आहे.

हेही वाचा: धनगर आरक्षण चळवळीत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांसाठी मदत व नोकरीची मागणी; आमदार गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा