पेठ–नायकलवाडी रस्त्यावर बिबट्याची झडप; 12 वर्षीय मुलासह तिघे जखमी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
पेठ–नायकलवाडी रस्त्यावर बिबट्याची दहशत; तिघे जखमी. (प्रतिनिधिक छायाचित्र)

पेठ : सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा तालुक्यात बिबट्याची दहशत कायम असून पेठ-नायकलवाडी रस्त्यावर बिबट्याने दोन दुचाकींवर झडप घालून हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 12 वर्षीय मुलासह तिघे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पेठ येथील यात्रेहुन करमाळा गावाकडे परतत असताना विकास रघुनाथ पाटील यांच्या दुचाकीवर अंधारात अचानक बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात विकास पाटील यांच्या उजव्या पायाला बिबट्याचे दात लागून ते जखमी झाले, तर त्यांच्या मागे बसलेल्या 12 वर्षीय विराज विकास पाटील याच्या गुडघ्याला पंजा लागल्याने तोही बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला.

घटनेनंतर काही वेळातच त्याच परिसरातून जाणाऱ्या आणखी एका दुचाकीस्वारावर बिबट्याने झडप घातल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दुसऱ्या हल्ल्यात प्रकाश शंकर मुळीक यांच्या दुचाकीवरही हल्ला झाला असून त्यांच्या पायाला किरकोळ इजा झाली आहे.

जखमींना तातडीने इस्लामपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल होऊन घटनेची माहिती घेतली.

दरम्यान, गेल्या महिन्यातही या परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने रात्री प्रवास करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: मिरजेत आईकडून पैशासाठी दोन बालकांची विक्री; नवजात मुलीच्या विक्रीचा प्रयत्न, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा