सांगलीत स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढल्याच्या तक्रारी; खासदार विशाल पाटील यांचा अधिकाऱ्यांना जाब

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात विद्युत समिती बैठक; खासदार विशाल पाटील आणि अधिकारी उपस्थित.

सांगली : जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचा मुद्दा खासदार विशाल पाटील यांनी उपस्थित केला. तंत्रज्ञानाचा फायदा नागरिकांना व्हावा, मात्र त्याचा भुर्दंड जनतेवर पडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विद्युत समिती आढावा बैठकीत वीजपुरवठ्याची स्थिती, प्रलंबित कामे आणि नव्या वीजजोडण्यांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण आणि शहरी भागात अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा झाली.

यावेळी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सध्या वेगाने सुरू असले तरी अनेक नागरिकांकडून वीजबिल वाढल्याच्या तक्रारी येत असल्याचे खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

वीज व्यवस्थापन पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे, मात्र त्याचा आर्थिक भार सामान्य नागरिकांवर पडू नये. वीजविषयक तक्रारी तत्परतेने सोडवाव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

हेही वाचा: भाजीपाला रोपवाटिका सुरू करण्यासाठी 2.77 लाखांपर्यंत अनुदान; ‘अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना’.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा