सांगली : शेतकऱ्यांना भाजीपाला रोपवाटिका सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चावर 50 टक्के अनुदान दिले जाणार असून 2 लाख 77 हजार 500 रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. तसेच रोपवाटिका उभारण्यासाठी कायमस्वरूपी पाण्याची सुविधा असणे गरजेचे आहे.
भाजीपाला रोपवाटिकेमुळे शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळून उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: आटपाडीतील तरुणांचा ‘फुला’ चित्रपट; राजीव खांडेकर यांच्या उपस्थितीत पोस्टर व संगीत प्रकाशन सोहळा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










