उमदी जवळ ओव्हरटेक करताना बुलेटची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
उमदी जवळ ओव्हरटेक करताना बुलेटची दुचाकीला धडक. (फाईल फोटो)

जत : तालुक्यातील उमदी गावाजवळील शेवाळे वस्ती परिसरात भरधाव बुलेट मोटारसायकलने ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित बुलेट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास मंगळवेढाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर ही घटना घडली. जखमी व्यक्ती बजाज डिस्कव्हर या दुचाकीवरून जात असताना, मागून आलेल्या बुलेट मोटारसायकलने जोरात धडक दिली.

अपघातानंतर जखमीला तातडीने साई समर्थ हॉस्पिटल, मंगळवेढा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात त्याच्या पायाला तसेच अंगावर विविध ठिकाणी दुखापत झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बुलेट चालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सत्यवान दगडू बंडगर (रा. हाजापूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: सांगलीत टपाल जीवन विमा पुन्हा चर्चेत; कमी प्रीमियममध्ये 50 लाखांपर्यंत संरक्षण.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा