Koyna Dam Earthquake: वारणा, कोयना धरण परिसरात भूकंप

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Warna Koyna Dam Earthquake 2025

Warna Koyna Dam Earthquake | सांगली : वारणा धरण परिसरात मंगळवारी (दि. ३०) मध्यरात्री भूकंपाची नोंद झाली. वारणावती (ता. शिराळा) येथील भूकंप मापक केंद्रावर १२ वाजून ९ मिनिटांनी ३ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप नोंदला गेला.

भूकंपमापक केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून सुमारे २८ किलोमीटर अंतरावर होता. सौम्य तीव्रतेमुळे परिसरात कोणालाही कंपन जाणवले नाही तसेच कोणतीही जीवित हानी किंवा नुकसान झाल्याची नोंद नाही.

दरम्यान, कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. याचा केंद्रबिंदू कोयना खोर्‍यातील हेळवाक गावाच्या नैऋत्येला सुमारे ६ किलोमीटर अंतरावर, तर कोयना धरणापासून ४ किलोमीटरवर होता.

दोन्ही ठिकाणी नोंदलेले भूकंप सौम्य स्वरूपाचे असल्याने स्थानिकांना घाबरण्याचे कारण नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: केंद्राची प्रतीक्षा न करता राज्य सरकारने आपल्या निधीतून सुरू केली मदत; शेतकरी व पूरग्रस्तांना दिलासा.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा