Shirala Leopard Scare : ऊस पट्ट्यात बिबट्याची दहशत कायम; शिराळा तालुक्यात बिबट्याची दोन पिले आढळल्याने ऊसतोड थांबवली

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Shirala Leopard Scare Sugarcane Field Cubs Found

शिराळा | शिराळा तालुक्यातील ऊस पट्ट्यात बिबट्यांचा मुक्त संचार आणि वारंवार सापडणारी बिबट्याची पिले यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंधरा दिवसांत चार वेगवेगळ्या घटनांमुळे तालुक्यातील ऊसतोड पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शनिवारी (दि. 6) कापरी (ता. शिराळा) येथे शिवाजी बाळा पाटील यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना पंधरा ते वीस दिवस वयाची बिबट्याची दोन पिले आढळून आली. ही माहिती मिळताच वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पूर्वीही याच शेतात पिले सापडली होती

यापूर्वी बुधवारी (दि. 26) सकाळी याच शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याची दोन पिले आढळली होती. त्यावेळी वनविभागाने तात्काळ ऊसतोड थांबवत तीन ट्रॅप कॅमेरे बसवले होते. पिले सुरक्षित ठेवण्यात आल्यानंतर अवघ्या दोन तासांत मादी बिबट तेथे येऊन पिले घेऊन गेली, हा संपूर्ण प्रकार ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला होता.

पुन्हा तीच घटना; परिसरात घबराट

मात्र शनिवारी पुन्हा तसाच प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. बिबट्याच्या सततच्या हालचाली लक्षात घेता संपूर्ण परिसरातील ऊसतोड तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

प्राणिमित्र सुशीलकुमार गायकवाड यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वनाधिकारी अनिल वाजे आणि दत्तात्रय शिंदे यांना कळवले. त्यानंतर पथकाने घटनास्थळाची पाहणी करून ग्रामस्थ व मजुरांना सुरक्षित अंतरावर हलवले.

पिलांची काळजी; पुन्हा मादीशी भेट घडवण्याचा प्रयत्न

वनविभागाचे अधिकारी अनिल वाजे, दत्तात्रय शिंदे, सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड आणि युनूस मणेर यांनी बिबट्याच्या पिलांना काळजीपूर्वक शिराळा येथील वनविभाग कार्यालयात आणले. दोन तासांच्या अंतराने दिवसभर पिलांना दूध पाजण्यात आले.

सायंकाळी पुन्हा एकदा मादी बिबट व पिलांची पुनर्भेट घडवून आणण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वनविभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : BREAKING | Miraj: मार्केटमधील अतिक्रमण कारवाईवेळी तणाव, आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे महापालिका पथक माघारी, खोक्याला पुन्हा अंतिम मुदत.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा