सांगली : बुधगाव परिसरातील नागरिकांच्या प्रलंबित शासकीय कामांचा निपटारा करण्यासाठी 14 मार्च रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विविध सरकारी योजनांचा लाभ आणि कागदपत्रांची कामे एकाच ठिकाणी पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे शिबिर बुधगाव, बिसुर, नांद्रे, वाजेगाव आणि खोतवाडी या गावांतील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले आहे. शिबिर ईशिता मल्टिपर्पज हॉल, बुधगाव येथे शनिवार (14 मार्च) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे.
या शिबिरात नागरिकांच्या 7/12 उताऱ्यातील दुरुस्ती, 8-अ उतारे, फेरफार प्रकरणे, जात-उत्पन्न व रहिवासी दाखले, नॉनक्रिमिलिअर प्रमाणपत्र, रेशन कार्ड व आधार दुरुस्ती आदी कामांबाबत मदत केली जाणार आहे.
तसेच PM Kisan Yojana नोंदणी, आयुष्मान भारत योजना, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना यांसारख्या विविध सरकारी योजनांबाबत मार्गदर्शन आणि नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हेही वाचा: सांगलीत 17 ते 20 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










