सांगली : कुपवाड औद्योगिक वसाहतीतील पिस्टन मेनन चौक ते सह्याद्री स्टार्च रोड परिसरात पोलिसांनी छापा टाकून पिस्तूल, जिवंत काडतुसे व धारदार शस्त्रांसह तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.
मारुती विलास शिंदे (वय 30), सरफरोश असलम समलेवाले (वय 25) आणि प्रथमेश आनंदा माने (वय 21, सर्व रा. वाघमोडे नगर, कुपवाड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांकडे बेकायदेशीर हत्यारे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या झडतीत एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक लोखंडी चाकू व एक एडका आढळून आला. बेकायदेशीर हत्यारांसोबतच एक दुचाकीही पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या शस्त्रबंदी आदेशाच्या कालावधीत ही शस्त्रे बाळगल्याचा प्रकार उघड झाला. प्राथमिक चौकशीत संबंधितांनी शस्त्रांचा वापर दहशत निर्माण करण्यासाठी केल्याचे सांगितल्याची माहिती आहे.
या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: संसदेत गॅस वितरणाचा मुद्दा; सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा सवाल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










