Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk

Sangli Crime News: विट्यातील एका शाळेतील शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठवून, पोस्टर्स दाखवत त्रास दिल्याप्रकरणी कडेगाव येथील एका व्यक्तीला विटा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

२०२४ पासून शिक्षिकांना त्रास दिल्याचा आरोप

पोलिसांच्या माहितीनुसार, दिलीप पंडितराव कुलकर्णी (रा. कडेगाव) याच्यावर एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षिका आणि त्यांच्या चार महिला सहकाऱ्यांना अश्लील पत्रे पाठवल्याचा आरोप आहे. २०२४ पासून ३० जानेवारी २०२६ पर्यंत हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

संबंधित महिलांच्या पत्त्यावर पोस्टाने अश्लील मजकूर असलेली पत्रे पाठविण्यात आली. तसेच पगारवाढीचा विषय आणि हा प्रकार थांबवण्यास सांगितले नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

अश्लील पोस्टर्स दाखविल्याची तक्रार

पत्रांव्यतिरिक्त अश्लील शेरेबाजी करून तसेच अश्लील पोस्टर्स दाखवून महिलांना त्रास दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या एका शिक्षिकेने विटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अभिजित कणसे यांच्या पथकाने १३ ऑगस्ट रोजी दिलीप कुलकर्णी याला अटक केली. त्याला विटा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

महिला आयोगाकडेही तक्रार

या प्रकरणातील पाच शिक्षिकांनी यापूर्वी महिला आयोगाकडेही तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. दरम्यान, संशयित काही काळ फरार असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, संबंधित पत्रे कोणाच्या मदतीने पाठवण्यात आली आणि संशयिताला फरार असताना कोणी मदत केली, याचा तपास करण्याची मागणी नागरी हक्क समितीचे अध्यक्ष सुनील सुतार यांनी केली आहे. पोलिसांकडून या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा