पुणे विभाग पदवीधर व शिक्षक निवडणूक: सांगलीत उद्या मतदान; भरपगारी सुट्टी, १३ ठिकाणचे आठवडा बाजार बंद

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
पुणे विभाग शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी उद्या मतदान; शासकीय सुट्टी, खासगी कर्मचाऱ्यांना ४ तासांची सवलत आणि १३ ठिकाणचे आठवडा बाजार पुढे ढकलले. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली टुडे वृत्तसेवा: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान पार पडणार आहे. निवडणूक शांततेत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान पथके साहित्य घेऊन केंद्रांकडे रवाना झाली आहेत.

जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षक व पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे. मतदारांची सोय, कायदा व सुव्यवस्था आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे आहेत:

मतदारांना विशेष सुट्टी; खासगी कर्मचाऱ्यांना ४ तासांची सवलत 

निवडणुकीतील मतदार असलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी विशेष नैमित्तिक रजा (भरपगारी सुट्टी) मंजूर करण्यात आली आहे. ही रजा त्यांच्या नेहमीच्या रजेव्यतिरिक्त असेल. तसेच खासगी आस्थापना, कारखाने व दुकानांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानासाठी पूर्वी ठरवून दिलेल्या दोन तासांऐवजी ४ तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली-उगले यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील १३ ठिकाणचे आठवडा व दैनंदिन बाजार बंद 

मतदान केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये जिल्ह्यातील १३ ठिकाणचे भरणारे शुक्रवारचे बाजार बंद ठेवून पुढे ढकलले आहेत.

आठवडा बाजार बंद असलेली ठिकाणे

मिरज तालुक्यातील बुधगाव, मालगाव, सांगली मनपा क्षेत्रातील पंचशिल नगर – प्रभाग क्रमांक 1 व कुपवाड मनपा क्षेत्रातील कुपवाड (वारणाली गेट, लक्ष्मी मंदिर, कापसे प्लॉट – प्रभाग 3), कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग, तासगाव तालुक्यातील विसापूर, जत तालुक्यातील माडग्याळ, खानापूर (विटा) तालुक्यातील खानापूर, कडेगाव तालुक्यातील कडेगाव, वाळवा तालुक्यातील वाळवा, चिकुर्डे व आष्टा तसेच शिराळा तालुक्यातील शिरशी या गावांचा समावेश आहे. 

मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कडक निर्बंध 

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या इमारतीपासून १०० मीटर परिसरात २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून मतदान संपेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास, प्रचार करण्यास, घोषणाबाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच केंद्रांच्या परिसरात झेरॉक्स दुकाने, फॅक्स, लाऊडस्पीकर आणि अनधिकृत व्यक्तींना मोबाईल फोन वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

निवडणुकीचा महत्त्वाचा लेखाजोखा:

  • पदवीधर मतदारसंघ: १५९ मतदान केंद्रे | ८८ हजार ७० मतदार | रिंगणात ४७ उमेदवार
  • शिक्षक मतदारसंघ: ४८ मतदान केंद्रे | ८ हजार ६२ मतदार | रिंगणात ३० उमेदवार
  • मतदान कर्मचारी: १ हजार ६१४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
  • मतमोजणी: मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ (श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे)

मतदारांना यादीत आपले नाव शोधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाचा: पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत तुमचे नाव आहे का? मोबाईलवरून १ मिनिटात असे तपासा.

हेही वाचा: Maharashtra Government New Scheme: ‘लाडकी बहीण’ योजनेनंतर सरकारची महिलांसाठी नवीन योजना; शाळा-कॉलेजांमधून सर्व्हे सुरू, सांगलीच्या पालकमंत्र्यांनी दिली माहिती.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा