Sangli Crime News | सांगली : प्रेमात सगळं माफ असत अस म्हणतात, पण वास्तवात तस नसत. सांगलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथ प्रेयसीला महागडी भेटवस्तू देण्याच्या नादात तरुणाने गुन्ह्याचा मार्ग स्वीकारला. शेवटी त्याला आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पार्श्व अनिल माणगावकर या तरुणाला आपल्या प्रेयसीच्या वाढदिवसासाठी पैसे हवे होते. भेटवस्तू महागडी असल्याने त्याने थेट जबरी चोरीचा प्लॅन आखला. या गुन्ह्यात त्याने आपला मित्र हृषीकेश मोहन पाटणे याला देखील सामील केले.
दोघांनी हरिपूर गावातील 70 वर्षीय वनिता रामचंद्र रहाटे यांच्या घरी चोरी करण्याचा निर्णय घेतला. पार्श्वने पाणी मागण्याचा बहाणा करून घरात प्रवेश केला आणि वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर गळ्यातील सोन्याची माळ आणि कर्णफुले असा सुमारे ₹1 लाख 55 हजारांचा ऐवज चोरून नेला.
तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
हेही वाचा: सांगलीला मिळाले राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे सीईओ.