Sangli Rashtravadi Nishedh Morcha 2025 | सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज (22 सप्टेंबर) सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये राज्यभरातील खासदार, आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या निषेध मोर्चाद्वारे आ. पडळकर यांनी केलेल्या विधानाचा निषेध नोंदवण्यात येणार असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जाणार आहे. तसेच, जत येथील अभियंत्याच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या मोर्चामधून होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, खासदार बजरंग सोनवणे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी १ वाजता पुष्पराज चौकातून मोर्चास सुरुवात होऊन राजारामबापू पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप होईल त्यानंतर त्या ठिकाणी सभा होणार आहे.
हेही वाचा: कोयनेतून विसर्ग वाढला, कृष्णेची पाणी पातळी वाढली; नदीकाठची शेती पुन्हा पाण्याखाली.