सांगली : सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात प्रसूतीनंतर नवजात बाळाला रुग्णालयातच सोडून एक महिला निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर 2025 रोजी कर्नाटकातील 25 वर्षीय महिला प्रसूतीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती.
दुसऱ्या दिवशी 26 नोव्हेंबर रोजी त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र नवजात बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रुग्णालयातील एनआयसीयु विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, 3 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 1 वाजता संबंधित महिला कोणालाही न सांगता रुग्णालयातून निघून गेल्याचे आढळून आले. त्यानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र ती परत आली नाही.
या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुरुवार (दि. 6 मार्च) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: माधवनगरमध्ये घरासमोरून दुचाकी चोरी; संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










