सांगली : जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसानंतर रविवारी सकाळपासून तुरळक सरींचा क्रम दिसला. सततच्या पावसामुळे नदीपात्र आणि धरणांमध्ये जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या कोयनेतून 2,100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 11 फूट 3 इंचावर स्थिर आहे.
शनिवारपासून जिल्हाभर मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर रविवारी तुरळक सरींच्या स्वरूपात पाऊस झाला. 1 ते 14 सप्टेंबरदरम्यान सांगली जिल्ह्यात एकूण 38.9 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, केवळ रविवारीच 17.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सध्या जिल्ह्यातील प्रमुख धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली असून, 98 टक्क्यांहून अधिक जलसाठा झाला आहे. रविवारी वाळवा, तासगाव, कडेगाव, शिराळा आणि मिरज तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
पुलांवरील पाणी पातळी (फुटात)
आयर्विन पूल : 11.3
भिलवडी पूल : 10
ताकारी पूल : 10
कृष्णा पूल (कराड) : 5.10
बहे पूल : 4.11
🔴 हेही वाचा 👉 इस्लामपूरात मुसळधार पावसाने आठवडा बाजार उद्ध्वस्त; भाजीपाल्याचे मोठे नुकसान, शेतकरी-व्यापाऱ्यांमध्ये संताप.