सांगली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता फेब्रुवारीअखेरीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 227 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या हप्त्याचा थेट लाभ मिळणार आहे.
सांगली जिल्ह्यातून पीएम किसान योजनेसाठी एकूण 4 लाख 12 हजार 506 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 11 हजार 279 अर्जांमध्ये त्रुटी असल्याने संबंधित अर्जदारांनी कागदपत्रे पूर्ण केल्यानंतरच त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये तीन समान हप्त्यांत दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे एकूण 21 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून आता लवकरच 22 वा हफ्ता जारी केला जाणार असल्याचे संकेत आहेत.
शेतीसाठी वाढलेला खर्च आणि शेतमालाला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, शेतकरी संघटनांकडून पीएम किसान योजनेच्या हफ्त्याच्या रकमेत वाढ करण्याची मागणी होत असली तरी 2026 च्या अर्थसंकल्पात सरकारकडून या योजनाच्या रकमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










