Sangli Mahanagarpalika News | सांगली : सांगली महापालिका क्षेत्रातील 42 सदोष रस्त्यांची दुरुस्ती आता थेट ठेकेदारांकडून करून घेण्याचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले आहेत. शहरातील रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत कसोशीने लक्ष ठेवण्याचेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आतापर्यंत प्रभाग समिती क्र. 1 मधील 14 आणि प्रभाग समिती क्र. 2 मधील 3 असे एकूण 17 रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित रस्त्यांची कामे तातडीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नगर अभियंता महेश मदने व शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना आदेश देण्यात आले आहेत.
यापुढेही महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: मिरज एज्युकेशन सोसायटीच्या नूतन शैक्षणिक संकुलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.