कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगर परिसरात पूर्वीच्या भांडणाच्या रागातून तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवार, दि. 24 रोजी घडली. या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
जखमींमध्ये रवींद्र माळी (वय 34), प्रमोद माने आणि अविनाश देशमुख यांचा समावेश आहे. तक्रारीनुसार काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.
संशयितांनी धारदार शस्त्रे व लाकडी दांडक्यांचा वापर करून हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले असून हल्ल्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत.
कुपवाड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयितांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा: शाळा खोल्यांच्या बिलासाठी 88 हजारांची लाच; जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता रंगेहात पकडला.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









