जत : जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे बिल मंजुरीसाठी पाठविण्याच्या बदल्यात 88 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता संजय भगवान सुतार (वय 51, रा. मिरज) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
तक्रारदाराने मजूर संस्थेमार्फत शाळेतील वर्ग खोल्यांचे बांधकाम व दुरुस्तीचे काम पूर्ण केले होते. संबंधित बिल जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी अभियंत्याने पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सापळा रचला. जत पंचायत समितीच्या आवारात रक्कम स्वीकारताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: मुलाला घेऊन जाण्यावरून वाद; आटपाडी तालुक्यातील पारेकरवाडीत लोखंडी गजाने हल्ला, चौघे जखमी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










