Sangli Politics : बंडखोरीचा फटका; भाजपकडून माजी नगरसेवकांसह ९ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : प्रातिनिधिक छायाचित्र (भाजप पक्षचिन्ह)

सांगली : सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान पक्षाविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून भाजपने सांगली शहरातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई केली आहे. पक्षाने तात्काळ नऊ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन केल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी ५ जानेवारी रोजी आदेश काढून ही कारवाई केली असून, शनिवारी ती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये युवराज बावडेकर, कल्पना कोळेकर, सोनाली सागरे यांच्यासह एकूण नऊ माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, संबंधितांनी पदाधिकारी असतानाही पक्षविरोधी भूमिका घेऊन निवडणूक लढवली. त्यामुळे पक्षशिस्तीचा गंभीर भंग झाला असून, भाजपची प्रतिमा मलिन करणारे वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ही बाब गंभीर असल्याने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सुजित राजाराम काटे, युवराज सतीश बावडेकर, रविंद्र भैरू ढगे, दीपक माने, अक्षय पाटील, प्रियानंद कांबळे, सौ. कल्पना कोळेकर, सौ. सोनाली सागरे आणि महेश सागरे यांचा समावेश आहे.

निलंबनाच्या कालावधीत संबंधित व्यक्तींना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांपासून दूर ठेवण्यात आले असून, भाजपचे नाव, चिन्ह किंवा कोणत्याही प्रकारे पक्षाचे प्रतिनिधित्व करण्यास मनाई करण्यात आली आहे. यापुढे पक्षाबाबत गैरसमज पसरवणारा प्रचार केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा: मिरज ग्रामीण भागात ट्रॅक्टर-ब्लोअर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा