सांगली : सांगलीतील पंचशीलनगर परिसरात निवडणूक प्रचाराच्या वादातून एका दाम्पत्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आनंदा वसंत लिगाडे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंदा लिगाडे आणि संबंधित संशयित हे एकमेकांच्या परिचयातील आहेत. निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पंचशीलनगर येथे हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रचाराच्या कामावरून वाद झाल्यानंतर संशयितांनी आनंदा लिगाडे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भांडण सोडविण्यासाठी आनंदा लिगाडे यांच्या पत्नी आरती लिगाडे मध्यस्थी करण्यासाठी आल्या असता त्यांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर जखमी दाम्पत्याने संजयनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संजयनगर पोलिस सदर प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा: उपवळे येथे 9 वर्षांच्या मुलीवर बिबट्याचा हल्ला; भावामुळे बचावली.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










