विभागीय माहिती कार्यालयातर्फे निबंध व घोषवाक्य स्पर्धेला मुदतवाढ; २५ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारल्या जाणार प्रवेशिका

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
निबंध व घोषवाक्य स्पर्धेला मुदतवाढ – प्रतिनिधिक छायाचित्र

सांगली : शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित निबंध व घोषवाक्य स्पर्धेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुक स्पर्धकांना आपली प्रवेशिका २५ फेब्रुवारीपर्यंत पाठवता येणार आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १२ वीतील विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक (खुला गट) या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. यापूर्वी स्पर्धेची अंतिम तारीख १० फेब्रुवारी होती. संबंधित कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल झाल्याने स्पर्धेची मुदत वाढविण्यात आली आहे.

“श्री गुरु तेग बहादूर यांचे जीवन कार्य” या विषयावर सुमारे ५०० ते ६०० शब्दांचा निबंध सादर करायचा असून त्याच अनुषंगाने घोषवाक्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी आपला निबंध किंवा घोषवाक्य नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकासह hinddichadarkolhapur@gmail.com या ई-मेलवर २५ फेब्रुवारीपर्यंत पाठवावे.

या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ०२३१-२६६२६०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे व सन्मानपत्र देण्यात येणार असून इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सांगली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषद राज्यात दुसऱ्या क्रमांकावर.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा