Sangli Politics : सांगलीत भाजपच्या 78 जागांसाठी 570 अर्ज, निवड प्रक्रियेवर मोठा ताण

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
In Sangli, 570 applications have been received for 78 BJP seats (BJP Logo)

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपला आतूनच मोठी स्पर्धा जाणवत असून उमेदवारीसाठी मिळवण्यासाठी आश्चर्यकारक अशी गर्दी पाहायला मिळत आहे. एकूण 78 जागांसाठी तब्बल 570 अर्ज प्राप्त झाले असून, त्यामुळे निवड प्रक्रियेवर मोठा ताण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

विशेषतः प्रभाग क्रमांक 14 मध्ये उमेदवारीसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत असून या एकाच प्रभागातून तब्बल 70 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. हा प्रभाग भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानला जात असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी आपली दावेदारी भक्कम केली आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक 13 मध्ये परिस्थिती याच्या अगदी उलट दिसत आहे. येथे तीन जागांसाठी फक्त 10 अर्ज आले आहेत. या प्रभागात 2 महिला व 1 ना.मा.प्र.साठी आरक्षण आहे. तुलनेने कमी अर्ज आल्याने या प्रभागात निवड प्रक्रिया अधिक सोपी होण्याची शक्यता आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत स्पर्धेचे चित्र आता स्पष्ट होत असून, उमेदवार निवड हा पुढील काही दिवस पक्षासाठी सर्वात मोठा कसोटीचा मुद्दा ठरणार आहे.

हेही वाचा: घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या ऑपरेशननंतर जेरबंद; पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा