Jayant Patil News Marathi | सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याच निषेधार्थ २२ सप्टेंबर रोजी सांगलीत आंदोलनाच आवाहन करण्यात आल आहे.
सोशल मीडियावर जयंत पाटील यांच्या समर्थकांनी शेअर केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटल आहे की, “सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत या द्वेषाच निवडुंग रुजू देणार नाही. वाचाळवीरांना जशास तसे उत्तर दिल जाईल.”
हे आंदोलन सोमवार, २२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सांगलीच्या पुष्पराज चौकात होणार आहे. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच आवाहन करण्यात आल आहे.
पार्श्वभूमी
अलीकडेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील आणि स्व. राजारामबापू पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्याविरोधात राज्यभरात तीव्र निषेध होत असून, सांगलीतील हे आंदोलन त्याचाच भाग आहे.
हेही वाचा: जयंत पाटलांवर पक्ष सोडण्यासाठी दबाव; गोपीचंद पडळकरांना फडणवीसांचा पाठिंबा – संजय राऊत.