सांगली : एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींनाही समाजात सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना केवळ औषधोपचारच नव्हे, तर सहजीवन आणि कौटुंबिक आयुष्य सुखाने जगण्याची संधी मिळणेही तितकेच आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
सांगली येथील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन येथे आयोजित एचआयव्हीबाधित वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यास महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतून प्रतिसाद मिळाला असून एकूण 153 उमेदवारांनी विवाहासाठी नोंदणी केली.
जिल्हाधिकारी काकडे म्हणाले की, सांगली जिल्ह्यात एचआयव्हीसह जगणाऱ्या सुमारे 11 हजार व्यक्तींना मोफत एआरटी (ART) औषधोपचार दिले जात आहेत. औषधोपचारासोबत विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन या व्यक्तींचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल पटवर्धन, मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. पवार, लायन्स क्लब ऑफ सांगलीचे अध्यक्ष नितीन बंग आदी उपस्थित होते.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना समाजाने स्वीकारावे आणि त्यांना सुखी कौटुंबिक आयुष्या जगण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हेही वाचा: जत तालुक्यात महसूल समाधान शिबिर; 7/12 दुरुस्तीपासून पीएम किसान योजना नोंदणीपर्यंत 15 सेवा एकाच ठिकाणी.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










