लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC दुरुस्तीची अंतिम संधी; ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन बदल करता येणार

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC दुरुस्तीची अंतिम संधी; ३१ मार्चपर्यंत बदल करता येणार

सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र महिलांना e-KYC प्रक्रियेत आलेल्या अडचणींमुळे अद्याप लाभ मिळालेला नाही. याबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे.

e-KYC करताना काही लाभार्थ्यांनी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांच्या अर्जात अडचणी निर्माण झाल्या असून, अशा महिलांना ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC माहिती दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. ही दुरुस्ती ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे.

मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले की, पात्र असूनही लाभ न मिळालेल्या एकाही महिलेला लाभपासून वंचित ठेवले जाणार नाही. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना अद्याप हप्ता मिळालेला नाही, त्यांनी आपली e-KYC माहिती तपासून आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेळेत दुरुस्ती न केल्यास योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांनी ही संधी न चुकवता ३१ मार्चपूर्वी e-KYC दुरुस्ती पूर्ण करावी.

हेही वाचा: ७ फेब्रुवारीला सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा