सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.) यांनी जिल्ह्यातील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे सांगत, “एक मत सक्षम जिल्हा घडवू शकते,” असा संदेश सीईओ विशाल नरवाडे यांनी दिला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या स्थानिक विकासाची दिशा ठरवणाऱ्या असल्याने सर्व पात्र मतदारांनी मतदानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेषतः तरुण व महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी पुढे यावे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे व विचारपूर्वक मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील मतदारांनी लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभागी होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी द्यावी, असे आवाहन सीईओ विशाल नरवाडे यांनी केले आहे.
मतदारांसाठी उपयुक्त माहिती
दरम्यान, मतदार यादीत नाव तपासण्यासाठी नागरिकांनी ‘मताधिकार’ मोबाईल अॅपचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या अॅपद्वारे नाव, EPIC क्रमांकाच्या आधारे मतदार यादीत नाव तपासता येते. तसेच mahasecvoterlist.in या संकेतस्थळावरूनही मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC दुरुस्तीची अंतिम संधी; ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन बदल करता येणार.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










