सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने भाग लिपिकांना टॅब (टॅब्लेट) देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे कर संकलनाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते कर विभागातील भाग लिपिकांना टॅबचे वाटप करण्यात आले. यासोबतच कर विभागाच्या कार्यालयासाठी नवीन फर्निचर व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाच्या माहितीनुसार, टॅबच्या वापरामुळे कर संकलनाचे काम कागदमुक्त पद्धतीने करता येणार असून, नागरिकांच्या कर नोंदी रिअल-टाइम अपडेट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे करसंकलन प्रक्रियेत अचूकता वाढण्याबरोबरच नागरिकांनाही अधिक पारदर्शक सेवा मिळतील.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले की, कर विभागातील कर्मचारी हे महापालिकेचा महत्त्वाचा घटक असून, त्यांना अद्ययावत साधने उपलब्ध करून दिल्याने कामकाज अधिक कार्यक्षम होईल. सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे यांनीही या उपक्रमामुळे विभागाच्या कामगिरीत सकारात्मक बदल होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या उपक्रमामुळे महापालिकेच्या कर विभागाचे कामकाज अधिक आधुनिक पद्धतीने होणार असून, नागरिकांना करसंबंधी सेवा वेळेत व सुलभपणे मिळण्यास मदत होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: ‘एक मत सक्षम जिल्हा घडवू शकते’ – सांगली जिल्हा परिषद सीईओ विशाल नरवाडे यांचा मतदारांना संदेश.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










