Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने आता ई-केवायसी करण अनिवार्य केल आहे. मात्र या प्रक्रियेत लाभार्थींना मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेबसाइट उघडताना एरर दिसण, फॉर्म नीट न भरता येण, कागदपत्र अपलोड न होण, किंवा मोबाईलवर ओटीपी न येण – अशा अनेक समस्या महिलांना भेडसावत आहेत.
गावागावात महिलांना सायबर कॅफेची धाव घ्यावी लागत असून, वेळ आणि पैसा वाया जातोय. जरी दोन महिन्यांची मुदत सरकारने दिली असली तरी ई-केवायसी होत नसल्याने महिलांमध्ये अस्वस्थता आहे.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं की, “योजनेचा चुकीचा लाभ घेणाऱ्यांना रोखण्यासाठीच ई-केवायसी अनिवार्य करण्यात आल आहे. मात्र सर्वांना वेळेत सुविधा मिळावी यासाठी तांत्रिक त्रुटी लवकर दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
तज्ज्ञांच्या मते, एकाच वेळी अनेक जण वेबसाइटवर लॉगिन करत असल्याने सिस्टम स्लो होत आहे. त्यामुळे रात्री उशिरा किंवा पहाटे प्रयत्न करण फायदेशीर ठरू शकत. तरीही दिलेल्या मुदतीत सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण व्हावी यासाठी सरकारकडून तांत्रिक समस्या तातडीने सोडवण्याचे काम सुरु आहे.
हेही वाचा: गाळप हंगाम 2025–26 ला सुरुवात; ठरली ‘इतकी’ एफआरपी.