सांगली : मुलींच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘लेक लाडकी योजने’ अंतर्गत पात्र मुलींना आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेतून एकूण 1 लाख 1 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.
महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या कुटुंबातील एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुलगी जन्मल्यानंतरपासून ती 18 वर्षांची होईपर्यंत या योजनेतून विविध टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते.
लेक लाडकी योजनेअंतर्गत मिळणारा लाभ
- मुलगी जन्मल्यानंतर – ₹5,000
- इयत्ता पहिली – ₹6,000
- इयत्ता सहावी – ₹7,000
- इयत्ता अकरावी – ₹8,000
- मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर – ₹75,000
याप्रमाणे या योजनेतून एकूण ₹1,01,000 इतकी आर्थिक मदत दिली जाते.
लेक लाडकी योजनेबाबत अधिक माहितीसाठी सांगलीतील नागरिकांनी महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद सांगली कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा: 7/12 दुरुस्ती, दाखले, PM-Kisan व इतर सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी.
- अपघातात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना 2 लाखांची मदत; ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’
- सांगलीत गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मोठी कारवाई; ३७ एजन्सींची तपासणी, ३ जणांना अटक
- सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत समित्यांचे सभापती बिनविरोध; अतुल माने स्थायी समितीचे सभापती
- कडेगाव वांगी हिट अँड रन प्रकरण; जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू
- 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार 1.01 लाख रुपये; संपूर्ण माहिती जाणून घ्या
- 7/12 दुरुस्ती, दाखले, PM-Kisan व इतर सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी; बुधगाव येथे 14 मार्चला विशेष शिबिर









