कडेगाव : तालुक्यातील वांगी येथे अज्ञात पांढऱ्या चारचाकी वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अण्णु शंकर चव्हाण (वय 65, मूळ रा. पांढोझरी ता. जत, सध्या रा. वांगी ता. कडेगाव) हे कुटुंबासह वांगी परिसरात राहत असून ते मजुरीचे काम करत होते.
18 जानेवारी 2026 रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास ते वांगी सांगली हायवेवर गेले असता एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
या अपघातात चव्हाण गंभीर जखमी झाले होते. नातेवाईकांनी त्यांना प्रथम चिंचणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
सुमारे महिनाभर उपचार सुरू असताना 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार व धार्मिक विधींमुळे तक्रार देण्यास उशीर झाला असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.
या प्रकरणी अज्ञात पांढऱ्या चारचाकी वाहनचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा: 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार 1.01 लाख रुपये; संपूर्ण माहिती जाणून घ्या.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










