सांगली : शेती करताना अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत शेती व्यवसाय करताना शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा गंभीर अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य दिले जाते.
योजनेनुसार अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. तसेच अपघातात दोन्ही डोळे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास 2 लाख रुपये अनुदान मिळते.
अपघातात एक डोळा आणि एक हात किंवा पाय गमावल्यास 2 लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक हात किंवा पाय गमावल्यास 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हेही वाचा: सांगलीत गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मोठी कारवाई; ३७ एजन्सींची तपासणी, ३ जणांना अटक.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










