सांगली : जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा आणि घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान ३७ गॅस एजन्सी आणि ३१ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली असून ७१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ३ गॅस एजन्सींवर गुन्हे दाखल करून ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये निर्माण होणाऱ्या शंकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षता पथके नियुक्त केली आहेत.
या पथकांमार्फत जिल्ह्यातील गॅस एजन्सी आणि हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान घरगुती एलपीजीचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.
सध्या सांगली जिल्ह्यात एचपीसीएलचा ३६६२ मेट्रिक टन, बीपीसीएलचा १०३९ मेट्रिक टन आणि आयओसीएलचा ५७ मेट्रिक टन एलपीजी साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर किंवा गैरमार्गाने पुरवठा होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा: सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत समित्यांचे सभापती बिनविरोध; अतुल माने स्थायी समितीचे सभापती.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










