माधवनगरमध्ये घरासमोरून दुचाकी चोरी; संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
माधवनगर परिसरात घरासमोर उभी केलेली अ‍ॅक्टिवा दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : माधवनगर येथील सोमवार पेठ परिसरात घरासमोर उभी केलेली अ‍ॅक्टिवा मोपेड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली गुंजकर (वय 26) या माधवनगर येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. त्या आर.के.एच. हॉस्पिटल माधवनगर येथे नर्सिंगचे काम करतात.

दि. 2 मार्च रोजी रात्री बाहेर जेवण करून त्या रात्री सुमारे 12.10 वाजता घरी परतल्या. त्यावेळी त्यांनी आपली राखाडी रंगाची होंडा अ‍ॅक्टिवा 6G (MH-09 GS-2766) ही दुचाकी घरासमोर लावून हँडल लॉक करून ठेवली होती.

मात्र सकाळी सुमारे 9 वाजता कामावर जाण्यासाठी त्या खाली आल्यावर दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोध घेतल्यानंतरही गाडी न मिळाल्याने संजयनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.

चोरीस गेलेल्या अ‍ॅक्टिवाची किंमत सुमारे 40 हजार रुपये असून संजयनगर पोलिस पुढील तपास करत आहेत.

येथे वाचा: Sangli Crime News Today.

हेही वाचा: वाळवा तालुक्यात भीषण अपघात; पुलावर दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा